साहित्य प्रतिष्ठान - ई साहित्य - फ्री मराठी पुस्तके

साहित्य प्रतिष्ठान - ई साहित्य - फ्री मराठी पुस्तके:

साहित्य प्रतिष्ठान हि एक अशी मराठी वेबसाईट आहे, इथे तुम्ही दररोज तुमच्या आवडीच्या मराठी पुस्तकांचे वाचन फ्री मध्ये करू शकता, किंवा तुम्ही एक लेखक असाल तर तुम्ही तुमचे नाव नोंदवून या ठिकाणी तुमचे पुस्तक तुम्ही अपलोड करू शकता या Website ला भेट देण्यासाठी Www.esahity.com या लिंक वरती क्लिक करा. जाणून घेऊ या साहित्य प्रतिष्ठान ची थोडी माहिती त्यांच्याच वेबसाईट वरतून हि सर्व माहिती साहित्य प्रतिष्ठान या वेबसाईट मधून घेण्यात आले ली आहे, तुही त्यांच्या वेबसाईट वरती जाऊन वाचण्यासाठी इच्छुक असाल तर लिंक वरती
क्लिक करा.


  Sahitya Pratishthan

ई साहित्य प्रतिष्ठानवाले कोण आहेत ?

साहित्य प्रतिष्ठानचे हे १३ वे वर्ष आहे, पण याची सुरूवात पार २००४ साली झाली ऑनलाईन कवितांच्या ग्रुप मधून. नंतर त्यातल्या काही काही कवी आणि लेखक यांनी एकत्र येऊन ई पुस्तकं आणि ई नियतकालिकं प्रकाशन व वितरण करण्यासाठी ई साहित्य प्रतिष्ठान २००८ साली स्थापन करण्यात आले. या आधी कविता संग्रहा वरती काम करत होते. पण आता कथा कादंबरीपासून ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि प्रवासवर्णनांपासून ते विनोदापर्यंत सर्व प्रकारचं साहित्य. अगदी काम्सूत्रसुद्धा. बालवाङ्मयाचा विशेष विभाग. 

महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची इत्थंभूत माहिती देणारी सिरीज. इतक्या वर्षांत हजारो पुस्तकांचं प्रकाशन आणि पाच लाख वाचकांचं नेटवर्क उभं करण्यात त्यांना यश आलं आहे. Android apps द्वारे सुद्धा यातील काही पुस्तके उपलब्ध आहेत. वर्षाला सुमारे अर्धा कोटी पुस्तके मराठी वाचक डाऊनलोड करतात. ई साहित्य प्रतिष्ठान हा बहुतांशी तरूण लेखक कवींचा ग्रुप आहे. लेखक आणि कवींना स्वतःची पुस्तके स्वतः बनवण्यासाठी ई साहित्य प्रतिष्ठान सर्व सहाय्य करते. ई पुस्तकं बनवण्याची शिबीरंही घेतले जाते. 

तेही विनामूल्य. उत्साही दर्जेदार लेखक ई साहित्य प्रतिष्ठानकडे आपले मौल्यवान पुस्तक ई वितरणासाठी सोपवतात. तेही कसलेही मूल्य न आकारता. पुढे ई साहित्य ते पुस्तक लाखों वाचकांपर्यंत पोहोचवते. तेही विनामूल्य. आणि हे वाचक या चळवळीत नवनवीन वाचकांना आणतात. रोज अक्षरशः शेकडोंच्या संख्येने. 

एखादे पुस्तक तर दहा लाखांच्यावर वाचकांपर्यंत जाते. मित्रांनो नक्कीच या वेबसाईट वरती जाऊन वाचण्याचा आनंद घ्या, आणि कोणी लेखक असेल त्यांच्या साठी हि खूप फायद्याची वेबसाईट आहे, Www.esahity.com

Post a Comment

0 Comments